ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात "बौद्धिक संपदा हक्क” या विषयावरील परिसंवाद संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:-विजय एस अवसरमल

ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी (आय. क्यू. ए. सी.) व ज्ञानस्त्रोत केंद्र (ग्रंथालय) यांच्या संयुक्त विद्यमानाने "बौद्धिक संपदा हक्क” “Awareness on Intellectual Property Rights for the Aspiring Minds” या विषयावर दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी एक दिवसीय परिसंवादाचे  आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ. एस. एन. वैष्णव यांनी केले त्यात त्यांनी बौद्धिक संपदा हक्क याची प्रासंगिकता तसेच त्याची व्याप्ती या विषयी माहिती देऊन हे परिसंवादात  सहभागी मान्यवरांना तसेच विद्यार्थ्यांना कश्या प्रकारे  उपयोगी ठरणार आहे या विषयी सांगितले. [ads id="ads1"]  

परिसंवादात साठी मुख्य वक्ते म्हणून रावेर येथील श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जी. आर. ढेंबरे यांचा  परिचय  डॉ. एस. एन. वैष्णव  यांनी  करून  दिला. आपल्या व्याखानात प्रा. डॉ. जी. आर. ढेंबरे यांनी सर्वप्रथम सादरीकरणाच्या पहिल्या सत्रात बौद्धिक संपदे विषयी सर्वसाधारण माहितीचे विवेचन केले. तसेच बौद्धिक संपदाशी निगडीत विविध पैलूवर प्रकाश टाकला. व्याख्यानात त्यांनी विविध दाखले देत बौद्धिक संपदा आणि त्याचे उदाहरणासहीत स्पष्टीकरण केले. [ads id="ads2"]  

                                              यानंतर सादरीकरणाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. डी. बी. पाटील यांनी “बौद्धिक संपदा आणि स्टार्टअप” विषयी मार्गदर्शन केले. यात त्यांनी व्यवसाय आणि स्टार्टअप यामधील काय फरक आहे. कोणकोणत्या मुलभूत घटक आहेत ज्या एका व्यवसाय आणि स्टार्टअप या वेगळेपण दर्शवते. यानंतर त्यांनी पेटंट व ट्रेडमार्क  विषयी  माहिती देऊन प्रत्यक्ष पेटंट नोंदणी पर्यंतची माहिती दिली. तसेच या संदर्भात असलेले विविध कायदेविषयक तरतुदी व संशोधकाला मिळणाऱ्या  विविध संधी या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या काळात तज्ज्ञांशी हितगुज झाली व त्यांच्या मनात असलेल्या शंका त्यांनी तज्ज्ञांसमोर मांडल्या  यावर मार्गदर्शकांनी सखोल असे मार्गदर्शन केले. परीसंवाचा समारोप प्रसंगी सहभागी प्राध्यापकांनी आपली मनोगते व्यक्त करताना सांगितले की वक्त्यांनी आपल्या सादरीकरणात दोन्ही सत्रात खूप छान माहिती दिली. कार्यक्रमात शेवटच्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी समारोपप्रसंगी भाषणात "बौद्धिक संपदा हक्क” या विषयाचे परिसंवाद  आयोजनाबद्दल चे महत्व सांगितले तसेच या संबंधी असलेल्या शिखर संस्था व त्यांचा "बौद्धिक संपदा हक्क” या बद्दल असलेले कार्य या बद्दल विवेचन केले. तसेच बौध्दिक संपदा हक्क याविषयी विद्यार्थी, संशोधक, व्यवस्थापक यांना जाणिव होण्याची गरज आहे.


या एक दिवसीय सेमीनारला एकूण १०७ सहभागी यांची नोंद झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाचे प्रमुख प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, कार्यक्रमाचे सचिव डॉ. एस. एन. वैष्णव, समन्वयक डॉ. एस. एस.साळुंके, तसेच समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. के. जी. कोल्हे, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. जे. पी. नेहेते डॉ. व्ही. एन. रामटेके, डॉ. आर. व्ही. भोळे, डॉ. पी. आर. महाजन, प्रा. एस. आर. इंगळे, डॉ. एस. ए. पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एस. साळुंके यांनी तर तांत्रिक बाजू डॉ. जे. पी. नेहेते यांनी पार पाडली. यानंतर प्रा. एच. एम. बाविस्कर यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे तथा कार्यक्रमास लाभलेले तज्ञ मार्गदर्शक यांचे आभार मानले .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!