नाशिक (मुक्ताराम बागुल)नाशिक अंबड लिंक रोड भागात विराट नगर येथे कार मागे घेत असताना अंगणात खेळणाऱ्या अवघ्या 14 महिन्याच्या चिमूरडीच्या अंगावरून गेल्याने यात चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आला आहे. [ads id="ads1"]
आयजा अहमद खान असे ठार झालेल्या चिमुटचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विराट नगर येथे अमजद खान हे पत्नी व 14 महिन्याच्या मुलीसोबत राहत होते. सायंकाळच्या सुमारास ते घरासमोर गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी त्यांची मुलगी अंगनात खेळत होती. यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणाऱे हसनेन खान हे कार MH 15 HQ - 5686 मागे घेत असतांना कारच्या मागे फिरत आयीजाच्या अंगावरून कारचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली.[ads id="ads2"]
तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी अमजद खान यांच्या फिर्यादीवरून संशयित हसनेन खान यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अंबड पोलिसांनी हसनेन खान यांना दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी, गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. पुढील तपास अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र कुमार पानसरे हे करत आहेत.


