अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २३ फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 मानधन वाढीसह सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी दि. २३ फेब्रुवारीपासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत असहकार आंदोलन करणार आहेत.

Maharashtra राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना समान किमान कार्यक्रमांतर्गत भरीव स्वरुपाची मानधन वाढ करावी सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी नवीन व आधुनिक मोबाईल पुरवावे, पोशन ट्रॅकरवर माहिती भरण्याची भाषा शंभर टक्के मराठी करावी, अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांची पात्रत पूर्वीप्रमाणेच ठेवावी.  [ads id="ads1"]  

  नागरी भागातील अंगणवाड केंद्राचे सुधारीत घरभाडे लागू करावे. सेवा समा व मयत झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभाची थकीत रक्कम द्यावी, भारिया यांच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व कामगार न्यायालय धुळे यांच्या निकालानुसार अंगणवाड कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करावी, अशा विविध मागण्या आहेत. [ads id="ads2"]  

   या मागण्यांसाठी दि. १० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत अंगणवाड कर्मचारी केवळ आहार वाटप करतील. त्यानंत अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून दि. २ फेब्रुवारीपासून बेमुदत असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व माया परमेश्वर, शुभांगी पालशेतकर, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, दत्ता जगताप, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, शकुंतला चौधरी, वनिता देशमुख, नयना मराठे, तुळसा महाजन, तेजश्री गायकवाड, अश्विनी सुर्वे, अरुणा आठवले, विमल तीसकर हे करणार आहेत...

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!