रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर पोलीस स्टेशन येथे कायदा व सुव्यवस्थेच्या व आगामी शासकीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री व शब्बे मेअराज अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक मा कैलास नागरे पोलिस निरीक्षक रावेर यांच्या अद्यक्षतेखाली शंतता समितीची मिटींग घेण्यात आली. [ads id="ads1"]
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, नगर पालीकेचे माजी गटनेते आसिफ मोहम्मद, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पंकज वाघ, अँड. योगेश गजरे, माजी नगरसेवक सादीक शेख, सुधाकर नाईक, राहूल चौधरी, नितीन पाटील, लक्ष्मीकांत लोहार, वंचितचे रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, बंटी महाजन, विजय लोहार, प्रशांत पाटील, योगेश पाटील, भाऊलाल महाजन, महेमुद शेख, युसुफ खाँ, अब्दुल रफीक, शैलेश अग्रवाल, नामदेव महाजन, निलेश पाटील, डि.डि. वाणी, अय्युबखाँ उपस्थित होते. यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर पाटील, पद्माकर महाजन, दिलीप कांबळे, हरिष गणवानी व अय्युबखाँ यांनी मनोगत व्यक्त केले.
📣 हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे येथील कपिल पाटील यांची विदेशात गगनभरारी
📣 हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून चार वर्षीय बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
📣 हेही वाचा:- अवैध गौणखनिजाचा उपसा केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील तीन जणांना २ कोटी १७ लाख रुपयाचा दंड ; कारवाईने परिसरात मोठी खळबळ
सदर मिटिंगला रावेर, रसलपूर मुस्लिम पंच कमिटी सदस्य, शांतता समिती सदस्य, शिव जयंती उस्तव समितीचे सदस्य तसेच पो.स्टे. हद्दितील प्रतिष्ठित नागरिक उपस्थीत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जन्मतारीख व तिथीनुसार साजरी केली जाते. एकच शिवजयंती साजरी व्हावी यासाठी गुरुवारी दुपारी ४ वाजता रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहेत यावर चर्चा होणार आहेत.




