रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील उटखेडा (Utkheda Taluka Raver) येथून अल्पवयीन पळवून नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात रावेर पोलिस स्थानकात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads2"]
अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल
बऱ्हाणपूर जिल्ह्यातील (Burhanpur District) गरीब कुटुंब रोजगारानिमित्त उटखेडा तालुका रावेर (Utkheda Taluka-Raver) येथे वास्तव्यास असून या कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने गुरुवार, 9 रोजी सकाळी आठ वाजता काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी रावेर पोलिसात (Raver Police Station) तक्रार दिल्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.
📣 हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे येथील कपिल पाटील यांची विदेशात गगनभरारी
📣 हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून चार वर्षीय बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
📣 हेही वाचा:- अवैध गौणखनिजाचा उपसा केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील तीन जणांना २ कोटी १७ लाख रुपयाचा दंड ; कारवाईने परिसरात मोठी खळबळ


