फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
( डॉ.अनिल गुलाबराव पाटील यांनी केली विजयाची हॅट्रिक.तर डॉ.विजय एकनाथ सोनजे व प्रा.सुरेश रमेश अत्तरदे, यांची बिनविरोध निवड)
जळगाव जिल्हा महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतसंस्था मर्यादित, जळगाव च्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचे तिसऱ्यांदा वर्चस्व कायम राहिले, सन 2023 ते 2028 या पंचवार्षिक कालावधीसाठी लागलेल्या निवडणुकीत डॉ.अनिल गुलाबराव पाटील यांनी विजयाची हॅट्रिक करत तिसऱ्यांदा सर्वाधिक मतांनी विजय मिळवला तसेच त्यांच्यासह प्रगती पॅनलचे 11 चे 11 उमेदवार विजयी झाले प्रतिस्पर्धी गटातील काही उमेदवारांना तीन अंकी संख्या ही गाठता आली नाही. [ads id="ads1"]
प्रगती पॅनलचे विजयी उमेदवार
डॉ.अनिल गुलाबराव पाटील, रावेर
डॉ.विजय एकनाथ सोनजे,फैजपूर
डॉ.सुरेश रमेश अत्तरदे, धरणगाव
डॉ.किशोर गोविंद कोल्हे, ऐनपुर
डॉ.राजेंद्र शामराव पाटील, पारोळा
डॉ.अमित मधुकरराव देशमुख, भडगाव
डॉ.किशोर शिवलाल पाटील, अमळनेर
डॉ.शैलेशकुमार आबासाहेब वाघ, चोपडा
डॉ.संजीव बळीराम सावळे, मुक्ताईनगर
डॉ.सुनीता प्रमोद चौधरी,जळगाव
[ads id="ads2"]
डॉ.स्वाती वसंतराव शेलार, एरंडोल हे अकराचे अकरा उमेदवार विजयी झाले, पैकी डॉ.विजय एकनाथ सोनजे,फैजपूर व प्रा.सुरेश रमेश अत्तरदे, धरणगाव हे बिनविरोध निवडून आले होते उर्वरित 9 जागांसाठी महिला गटात 03 सर्वसाधारण गटात 12, आणि अनुसूचित जाती जमाती गटात 03 असे 18 उमेदवार परस्पर विरोधी उभे ठाकले होते परंतु सुज्ञ मतदार बांधवांनी प्रगती पॅनललाच विजयाचा कौल देत विरोधी गटाला एकंदरीत खूप मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला, 'प्रगती पॅनल' च्या सर्व उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविल्यामुळे जळगाव जिल्हा महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतसंस्था मर्यादित, जळगाव या संस्थेवर 'प्रगती पॅनल चे तिसऱ्यांदा वर्चस्व कायम राखन्यात यश आले. पुढील काळात सोसायटीला चांगल्या सुख सुविधांसहित सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील व सभासदांच्या हितासाठी योग्य ते बदलही केले जातील असे आश्वासन पॅनल तर्फे देण्यात आले, प्रसंगी प्रगती पॅनलचे विजयाचे शिल्पकार म्हणून प्रमुख मार्गदर्शक नेते प्र. प्राचार्य डॉ.विजय पवार, डॉ.मधु खराटे, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, प्राचार्य डॉ.एस.आर.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, प्राचार्य डॉ.आर.आर.अत्तरदे, प्र. प्राचार्य एन.एर.पाटील, इतर वरिष्ठ माजी संचालक व जिल्हा भरातील महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक, विविध संघटनाचे पदाधिकारी आदी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.


