रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
आज दिनांक 4/ 2 /2023 रोजी प्रहार दिव्यांग संस्था अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने रावेर येथील रेस्ट हाऊस मध्ये रावेर यावल मुक्ताईनगर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी कार्यकारणी यांची नियोजन आढावा मीटिंग घेण्यात आली. [ads id="ads1"]
त्याप्रसंगी दिव्यांग बांधवांचे अनेक विषय घेण्यात आले त्यात दिव्यांग विधवा निराधार यांचे ST SC मागासवर्गीय लोकांचे पगार दर महिन्याला वेळोवेळी देण्यात यावेत. तसेच पगारांचे प्रकरण जमा केल्यावर अपात्र झालेल्या व्यक्तींना पत्र व्यवहाराने त्यांना कळविले जात नाहीत. त्यामुळे त्यांचे पगाराचे प्रकरणे दोन ते तीन वर्षापर्यंत पडून असतात याला जबाबदार (कर्मचारी की तहसीलदार ?
असे प्रश्नचिन्ह दिव्यांग बांधवांमध्ये निर्माण झाले आहेत याबाबत तालुका दंडाधिकारी यांची लेकिन निवेदनाद्वारे तक्रार जिल्हाधिकारी अमन मित्तल साहेब यांच्याकडे करणार आहोत असे प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. [ads id="ads2"]
तसेच ग्रामीण भागामध्ये नवीन ग्रामसभा घेताना कृती आराखड्यामध्ये पाच टक्के दिव्यांग निधी देणे बाबत निवेदन देणे, तसेच रावेर यावल मुक्ताईनगर तालुक्यातील सन 2013/ 16 चा जीआर नुसार दिव्यांग बांधवांना अद्याप 90 टक्के ग्रामसेवकांनी निधी वाटप केलेला नाही. अशे निवेदन रावेर येथील गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना चार महिने आधी प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे देण्यात आले होते.
हेही वाचा :- रेल्वेच्या धडकेत निंभोरा येथील युवकाचा मृत्यू : निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
पण रावेर येथील गटविकास अधिकारी सौ दिपाली कोतवाल मॅडम, यांनी दिव्यांग बांधवांचे सर्व निवेदन अर्ज फेटाळून लावले.
त्यामुळे दप्तर दिरंगाई अंतर्गत दिव्यांग बांधवांच्या त्यांच्या हक्काच्या योजना हिसकावून घेण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहेत. त्यामुळे सर्व ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, यांचे लेखी स्वरूपाची तक्रार प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यातर्फे जिल्हा परिषद (C O ) सीईओ, यांच्याकडे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
त्याप्रसंगी उपस्थिती प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील भाऊ, जिल्हा सल्लागार राजमल दादा वाघ, जिल्हा सचिव धर्मराज पाटील, रावेर प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष विनोद कोळी, मुक्ताईनगर प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष उत्तम जुम्बळे, यावल तालुका अध्यक्ष मोहनदास सोनार, रावेर तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष जितू कोळी, तालुका सचिव भागवत शेलोळे, तालुका सल्लागार विश्वनाथ भिल्ल, तालुका संघटक आनंद कोळी, सुलवाडी शाखाप्रमुख गोपाल कोळी, तालुका संपर्कप्रमुख मोहसीन खान, शहर प्रमुख मोहसीन शेख, तालुका कार्याध्यक्ष दिनेश सैमिरे, तालुका सह संघटक भरत पाचपोळे, यावल तालुका उपाध्यक्ष शाहरुख पटेल, यावल शहर संघटक, उत्तम कानडे यावलचे प्रदीप माळी राहुल सावखेडकर जनार्दन फेगडे फिरोज पटेल शेख मुस्ताक तसेच यावर पदाधिकारी कार्यकारणी यांना नियुक्तीपत्र देऊन ,सन्मानित करण्यात आले. इत्यादी प्रहार दिनांक संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.