ऐनपूर महाविद्यालयात सारी डे आणि चर्चा सत्र संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधी (दिनेश सैमिरे) : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे युवतीसभे द्वारे विद्यार्थीनिंसाठी सारी डे आणि चर्चासत्र कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. [ads id="ads1"]  

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनिंनि साडी पारंपरिक वेशभूषा करून आल्या होत्या. चर्चासत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी. अंजने यांनी भूषविले. चर्चासत्राचा विषय स्त्री शिक्षण, स्वातंत्र्य आणि वास्तव"हा होता.चर्चेचा सूर संमिश्र असा दिसून आला असला तरी बहुतांश मुली म्हणाल्या आम्हाला शिक्षण घेण्याचे, विषय निवडीचे, शाखा निवडीचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. विवाहित मुलींनीही घरून आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते असे सांगितले. [ads id="ads2"]  

   युवती सभेच्या सचिव प्रा. डॉ. नीता एस. वाणी आणि डॉ. रेखा पाटील यांनी आपल्या मनोगतात असे म्हणाल्या स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसतो मुलींनी आई, वडिलांच्या विश्वासाला तडा नं जाऊ देता शिक्षण घेतले पाहिजे. प्राचार्य डॉ. जे. बी अंजने आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले मुलींनी लग्नाचे वेटिंग म्हणून शिक्षण घेऊ नये तर करियर साठी शिक्षण घ्यावे मोबाईल चा वापर योग्य कारणासाठी करावा, पुढे गेलेल्या अनेक स्त्रियांचे त्यांनी दाखले दिले प्रास्ताविक युवती सभेच्या सचिव डॉ. नीता वाणी यांनी केले व सूत्रसंचालन चैताली पाटील हिने केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!