नाशिक (मुक्ताराम बागुल) नाशिक रोड येथील सब रजिस्टर कार्यालयातील अनागोंदी कारभार थोडी थांबवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल याबाबत शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने विभागीय महसूल उपायुक्त श्री रमेशजी काळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. [ads id="ads1"]
सदरच्या नियोजनात म्हटले आहे की, नाशिक रोड येथील नोंदणी भवन मधील सब रजिस्टर कार्यालयात सध्या अनागोंदी माजली असून या ठिकाणी कारत असणारी सब रजिस्टर हे सामान्यांची कामे आढळतात. कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक चुका काढतात. शिवाजी बिल्डर लॉबीला या ठिकाणी मालमत्ता नोंदणी करायची असल्यास व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. सामान्यांना मात्र नंबर डाउनलोड कार्यालयातच बसून ठेवले जाते. सामान्य माणसांनी येथे टोकणनुसार नंबर लावली असतात . मात्र बिल्डरला पाहिजे तेव्हा वेळ देऊन या ठिकाणी मालमत्ता नोंदणी करण्यात येते. [ads id="ads2"]
शिवाय मालमत्ता नोंदणीचे शासकीय शुल्का व्यतिरिक्त येथील सब रजिस्टर प्रत्येक नोंदणी मागे हजार ते दीड हजार रुपये लाच घेतात. प्रत्येक दास्ताचे निरनिराळ्या टेबलावर निरनिराळे पैसे द्यावे लागतात. या ठिकाणी सब रजिस्टर यांनी एजंट करून ठेवलेले आहे. या कार्यालयात सामान्य नागरिकांना मालमत्ता नोंदणी करायला त्रास होत असून बिल्डर लॉबीची अनेक कामे पैसे घेऊन नियमबाह्य झालेले आहेत. सदर कामाची ऑडिट करून येथील सब रजिस्टर चौधरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे दिलेल्या निवेदन पडले आहे.
याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोदजी बागुल, युवा नेते प्रतीक साळवे, दिव्या उबाळे, लता भोळे, वंदना पवार आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.