बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी ही गाव पूर्वी पासून च शेती, शिक्षण, क्रीड़ा,कला , यासारख्या अनेक क्षेत्रात गाजलेले गाव आहे. गुरुशिष्य महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समता मूलक विचाराने प्रेरित गाव..या गावात अनेक क्षेत्रात कार्य करणारे लोक जन्माला आली आणि त्यांनी सम्पूर्ण हयात त्या त्या क्षेत्रात आपले जीवन कार्य ठरऊन अभूतपूर्व योगदान दिले.लोककलेच्या क्षेत्रात अनेक शाहिर,लोककलावन्त ज्यामध्ये शाहिर बळीभाऊ यांचे सर्वोदय कलापथक पासून दिवंगत शाहिर केशव गवई,शाहिर जगदीश बोरकर, शाहिर ईश्वर मगर , शाहिर गजेंद्र गवई यांच्या मालिकेतिलच पण प्रसार माध्यमापासुन कायम दूर राहिलेले पण लोककलेच्या साठी जीवनभर एकनिष्ठ समर्पित कलावन्त शाहिर किसन गवई..दिनांक 16/03/2023 रोजी त्यांचा प्रथम स्मृतिदिन..त्यानिमित्ताने हा लेख प्रपंच..[ads id="ads1"]
कुठलीही कला,कौशल्य,कर्तबगारी,
खरी तर माणसाच्या जीवनात वारसाने किंवा स्वकर्तुत्वाने येत असते.कुठलाही सुरेख दागिना निर्मितिसाठी काही गुण सोन्याचे काही गुण सोनाराचे असावे लागतात त्याप्रमाणे एक कलावन्त निर्माण होनेसाठी घरात कलेचा पीढिजात वारसा,आवड़, वातावरण असावे लागते किंवा स्वतःच्या आवडीतुन कलावन्त उदयास येतो. पूर्वीच्या काली लोकप्रबोधन, जागृति साठी विविध कला खेळ, क्रीड़ा प्रकार अस्तित्वात आले ज्यामुळे लोकांचे मनोरंजन, प्रबोधन होत असे.ज्यामधुन भजन, कीर्तन, गायन,भारुंड, कलापथक,खड़ी गंमत, वादन,,तमाशा ,नाटक या कलांचा अंतर्भाव असे. दिवंगत बलवंता गवई यांची प्रथम पीढ़ी तमाशा लोककलेच्या नादी लागली ज्यामध्ये सोनाजी जाधव, चिन्धु जाधव, सखाराम गवई,महादु गवई, दशरथ गवई यासारखी हौशी कलावन्त होती, ज्यांचा गावाच्या बाहेर असलेल्या पांढरी च्या शेतात, मशाली,टेम्भे लाऊन रात्रभर तमाशा चालायचा, ज्यामध्ये ढोलक, तुनतुने चवंडके,झांज,कड़ी,घुंघरू इतकेच काय्य ते मोजके वाद्य संगीत असायचे. महिला पात्र करण्यासाठी पुरुष च असायचा ज्याला नाच्या म्हणायचे.तत्कालीन तमाशा विषय हे राजा, प्रधान, पौराणिक, धार्मिक असायचे, ज्यामध्ये कृष्ण, राधा, गवळनी,माउशी, पेंध्या,मथुरा,यासारखे पात्र असायचे पण त्यांचे संवाद तत्कालीन जरी असले तरी ते चालू सामाजिक परिस्थिति वर भाष्य असायचे.[ads id="ads2"]
या प्रथम लोककलावनताच्या फळी नन्तर दूसरी फळी ही शाहिर गोकुला,सुदामा जाधव, जाधव, शाहीर केशव गवई,यामध्ये लोककलावन्त ,गायक, विनोदी भूमिका सोंगाड्या,माऊशी असे बहूअंगी भूमिका साकारणारे दिवंगत शाहिर किसन गवई...
शाहिर किसन गवई यांचा जन्म वडील हौशी लोककलावन्त बलवंता गवई व पदमाबाई गवई यांचे पोटी दिनांक २३/०२/१९४४ रोजी झाला. केवळ दूसरी पर्यन्त प्राथमिक शिक्षण झाले ,अक्षर ओळख व आकड़े ओळख इतकेच काय्य ते शिक्षण...बालपण सारे वडील लोककलावन्त व कलेच्या वातावरणात ..घरात सतत इतर कलावन्त सह नाच्या कलावन्त यांची सराव करतेवेळी ये जा असायची.ते सर्व जवळून अनुभवले व पाहिले, त्यातिल अनेक गण, गवळन, गाणी , ऐकता ऐकता कायमचीच मुखपाठ झाली..
यातून मग ही दूसरी फळी अभी राहली ज्यामध्ये शाहिर किसन गवई एक खड़या आवाजाचा ,टिपेला गाणारा जबरदस्त गायक, सोंगाड्या, माऊशी आसे अनेक पात्र रंगवनारा लोककलावन्त तयार झाला..
मुलाचे बारशे, लग्न प्रसंग, शुभ प्रसंग किंवा हौशी ने लोक हे तमाशा कार्यक्रम आयोजित करायचे , तोड़के मानधन, टोपी रुमाल व नारळ हेच काय ते बिदागी असायची.. त्यामध्येच रात्रभर सदर तमाशा फड चालायचा,तत्कालीन हौशी व कलारसिक लोक ही रात्रभर बसून भर भरून टाळ्या, शिटया वाजूऊन दाद द्यायचे.
शाहिर किसन गवई यांचे शेकडो गाने, गण, गवळनी, लोकगीते मुखपाठ होती,अनेक लोकनाट्य संहिता, प्रसंग सादरिकरण करून सिद्ध करत होते.
आपल्या मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमात , मेरा बू सासरवाडित स्वतः साड़ी नेसुन रात्रभर प्रबोधन केल्याचे अनेक लोक आजही सांगतात. जीवनात शेकडो लोकरंजन, प्रबोधन कार्यक्रम करणारा हौशी कलाकार आपली कला पुढील पीढ़ी ला प्रवाहित करताना आपला मुलगा गजेंद्र गवई यांना सतत प्रेरणा देत राहिला.सदर लोककलेच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठ च्या लोककला अकादमी मध्ये एक वर्षाचा पद्वयुत्तर पदविका MFFA साठी प्रवेशित करून लोककला इतिहास व सादरिकरण यावर विशेष उपलब्धी करून दिली.त्यांच्याच प्रेरणे ने आज मितिला युवा लोकशाहीर गजेंद्र गवई यांचा लोकशिक्षण सांस्कृतिक कला संच दे माळी भारत सरकारच्या गीत व नाटक प्रभाग पुणे व महाराष्ट्र शासनाच्या माहिती संचालनालय अंतर्गत नोंदनीकृत असुन महाराष्ट्रभर हजारों लोककलेचे प्रभावी सादरिकरण करत आहेत. ज्याला शेकडो राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार, मान सन्मान मिळाले. दिवंगत शाहिर किसन गवई यांना
लोककलेच्या योगदानामुळे महाराष्ट्र शासनाचे वृद्ध लोककलावंत मानधन गेल्या दहा बारा वर्षापासून मिळत होते. वर्षभर
लिव्हर च्या बीमारी ने ग्रस्त शाहिर किसन गवई यांचे वर अनेक खाजगी रुग्णालयात उपचार करून शेवटी शासकीय रुग्णालय बुलडाणा येथे दिनांक १६ मार्च २०२२ ला निधन झाले.त्यांच्या अंत्यविधि व रक्षाविसर्जन ला संपूर्ण जिल्हाभरातून आलेला प्रचण्ड जनसमुदाय त्यांच्या कार्याची दखल घेणारा वाटला तो आजही स्मरणात आहे.
आशा या प्रसार माध्यमापासुन दूर असलेल्या परंतु जनमानसात आठवणीत असलेल्या लोकलावंतास , त्यांच्या स्मृति दिनी " स्मरण तुमचे हे मनोमनी.. आठवणी च्या ठाई ।
जाणीव तुमची होत राहिल , विसरता येत नाही।।" भावपूर्ण अभिवादन !!!
गजेंद्र गवई
राज्य समन्वयक
लोककलावन्त प्रबोधन परिषद,महाराष्ट्र
9850126154


