संपकरी कर्मचाऱ्यांचा रावेर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  

संपकरी कर्मचाऱ्यांचा  रावेर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा
 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) दि.15 येथील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामसेवक , तलाठी , पंचायत समिती कर्मचारी , तहसिल कर्मचारी , नगरपालिका , वनविभाग कर्मचारी , आरोग्य कर्मचारी , पशुवैद्यकिय कर्मचारी तसेच संपात सहभागी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी दि. १५ मार्च २०२३ रोजी पंचायत समिती रावेर य़ेथून सकाळी ठिक १०:३० वाजता   पायी मोर्चा डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक व तेथून तहसिल कार्यालय रावेर येथे संपन्न झाला.[ads id="ads1"]  

   मा. तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर यांना यावेळी निवेदन देण्यात आले जोपर्यंत जुनी पेंशन व इतर  मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर ठाम आहेत.[ads id="ads2"]  

        यावेळी कैलास घोलाणे ,जे.के.पाटील , शैलेश राणे, विनायक चौथे ,राजेंद्र फेगडे , निलेश पाटील , रविंद्र बखाल , दिलीप पाटील , हरिष बोंडे , प्रविण पाटील , दिपक गवई , प्रकाश महाजन , अनिल पाटील , कल्पना पाटील ,सिंधू राठोड , विजय पवार , जितेंद्र गवळी , विजय गोसावी ,उमेश दांडगे ,सुरेश इंगळे,चंदन पाटील तसेच तालुक्यातील विवीध संघटनांचे पदाधिकारी तसेच शेकडो कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!