ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे युवतीसभेद्वारे विद्यार्थीनिंसाठी सात दिवसांकरिता योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केले. [ads id="ads1"]
सूत्रसंचालन डॉ. नीता वाणी यांनी केले.आपल्या उदघाटनपर भाषणात त्यांनी योगाचे महत्व सांगून वर्तमानकाळात सर्व वयोगटाला आरोग्य चांगले राखण्यासाठी योगाची आवश्यकता आहे असे सांगून त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी शिबिराचा लाभ घ्यावाअसे आवाहन केले. युवती सभा सचिव डॉ. नीता एस. वाणी यांनी शिबिराचा उद्देश कथन करून शिबिराबाबत माहिती दिली. [ads id="ads2"]
विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन योगा शिक्षक श्रीमती स्वाती जोशी या करत आहेत त्यांनी प्रथम योगाचे प्रकार, योगाचे महत्व, वेगवेगळ्या आजारासाठी कोणता योगा करावा याबाबत मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत योगा शिक्षक श्रीमती कोमल पाटील त्यांना सहकार्य करीत आहेत. शिबिरास युवती सभा सचिव डॉ. नीता वाणी यांना डॉ. रेखा पाटील,डॉ. व्ही एन. रामटेके तसेच , जयेश बढे, श्रेयस पाटील शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे. योगा शिबिरात ५६ विद्यार्थ्यिनींनी सहभाग घेतला आहे.