प्रतिनीधी (फिरोज तडवी)
हसन मुश्रीफ याच्यावर तिसऱ्यांदा कारवाईचे आश्चर्य नाही, अनिल देशमुखांच्या केसमध्ये ईडी सीबीआयकडून वर्ल्ड रेकाॅर्ड केला होता. 109 वेळा छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे ईडी सीबीआयने विक्रम केला होता तो मोडायचा असेल ही शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्यांदा घरी जात आहे, तर पहिल्या दोन कारवाईत काय झालं याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे, असं खासदार सुप्रियाताई सुळे यांनी म्हटलं आहे.[ads id="ads1"]
'सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. मात्र, आता ही शंका न राहता खरंच त्या दिशेने पाऊल जात असल्याचे दिसून येत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे घटक आहेत. देशमुख, खडसे, राऊत, नवाबाभाई असतील त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, त्याच पद्धतीने कारवाई होत आहे. देशातील ईडी सीबीआयच्या 95 टक्के कारवाई या विरोधकांवरील आहेत. संविधानाचा सन्मान न करता केंद्र सरकार काम करत आहे. [ads id="ads2"]
खा.सुप्रियाताई सुळे यांनी मुश्रीफांवरील कारवाई संदर्भात अमित शाह यांच्या निर्दशनास आणून देणार असल्याचे म्हटले आहे. देशातील सर्वोच्च यंत्रणा कारवाई एखाद्या भाजप नेत्यांना आधीचं कस कळतं? याचा अर्थ ईडी आणि सीबीआयमध्ये कोठे लीकेज आहे.असा आरोप केला आहे,