रावेर (विनोद कोळी) ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. कांचन भागवत बारी टी. वाय. बी. एस. सी. हीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या महिला साॅफ्टबाॅल संघात निवड करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
क्रीडा स्पर्धा दिनांक १७ ते २१ मार्च २०२३ दरम्यान पंजाब विद्यापीठ, चंदिगड येथे होणार आहेत. विद्यापीठ सॉफ्टबॉल संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री भागवत विश्वनाथ पाटील, चेअरमन श्री श्रीराम पाटील, सेक्रेटरी श्री संजय वामन पाटील, उपाध्यक्ष श्री आर.एन. महाजन सर्व संचालक मंडळ प्राचार्य डॉ .जे. बी.अंजने महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन झोपे,डॉ . के. जी. कोल्हे डॉ. आर. व्ही. भोळे, प्रा. डॉ. रेखा पाटील,प्रा एस आर इंगळे, गोपाळ महाजन,श्रेयश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कु. कांचन भागवत बारी या विद्यार्थिनीला डॉ. सचिन झोपे, प्राचार्य डॉ .जे.बी. अंजने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले स्पर्धेसाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.



