ऐनपूर (विनोद कोळी) : ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महावीद्यालय ऐनपूर येथे युवतीसभेद्वारे एकदंत ग्राम संघ बचत गटा मार्फत विविध वस्तूंचे प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बि. अंजने यांनी केले. [ads id="ads1"]
एकदंत महिला बचत गटाच्या अध्यक्षा जोत्स्ना महाजन यांनी विद्यार्थीनीना बचत गटामार्फत विविध व्यवसाय करुन स्वावलंबी व्हा असे मार्गदर्शन केले. प्रदर्शनात केळी वेपर्स, पापड, कुरडया, मिरची पावडर, ज्वेलरी, मिरची पावडर, मसाले, कपडे, ब्लाउज पीस इत्यादी वस्तू मांडण्यात आल्या होत्या. [ads id="ads2"]
विद्यार्थीनींनी या वस्तूंची खरेदी केली तसेच एकदंत ग्राम संघातर्फे संस्कृती ब्युटी पार्लर च्या संचालिका वैशाली चौधरी यांनी बचत गटामार्फत महिलांसाठी सवलतीच्या दरात प्रमाणपत्र व प्रशिक्षणाच्या योजनेच्या बाबत विद्यार्थिनींना माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन युवती सभा सचिव डॉ. नीता वाणी यांनी केले त्यांना डॉ. रेखा पाटील यांनी सहकार्य केले.



