रावेर- नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आमदार श्री. सत्यजित सुधीर तांबे विजयी झाल्यामुळे पदवीधर मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी माजी विधान परिषद सदस्य आ.डॉ.सुधीर तांबे सरदार जी.जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रावेर येथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर तालुक्याचे माजी आमदार श्री.अरुण पांडुरंग पाटील होते.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश मुजुमदार यांनी केले. माजी विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी मनोगतातून मी रावेरवासी यांच्या कायम ऋणातच राहील. कारण जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक नोंदणी रावेर तालुक्यातून होते. व मतदानाची टक्केवारी ही रावेर तालुक्यातील मागील चारही पदवीधर निवडणुकीत होती.पदवीधरांसाठी कायम विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे आवाज उठवतील अशी ग्वाही माजी आमदार डॉ तांबे यांनी दिली. [ads id="ads2"]
यावेळेस विविध संस्थानी व संघटनांनी माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांचा सत्कार केला. जुनी पेन्शन योजना , शिक्षक भरती, वेतनेतर अनुदान, पुरवणी बीले, पायाभूत पदे, बेरोजगार मेळावा यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश राणे यांनी केले. आभार बी. एल. सरोदे यांनी मानले. या प्रसंगी युवानेते धनंजय शिरीष चौधरी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष श्री जे के पाटील सर , रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन डॉ. दत्तप्रसाद दलाल, रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, डॉ. सुभाष पाटील रावेर शिक्षण संवर्धक संघ संस्थेचे जेष्ठ संचालक प्रभाकर महाजन ग. स. सो. माजी संचालिका सौ. कल्पना पाटील प्रा. डी. एस. चौधरी प्रा. एस.बी. महाजन आर. बी. महाजन सर सरदार जी. जी. हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. ई. जे. महाजन मुख्याध्यापिका सौ. जे.एस. कुलकर्णी मॅडम रावेर शिक्षण संवर्धक संघाचे सहसचिव व कमलाबाई एस अगरवाल हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री. जयंत कुलकर्णी सर श्री.आर.एल. तायडे सर श्री. एस. पी. पाटील सर श्री.एस.आर. महाजन सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हर्षल पाटील सर सौ.अर्चना चौधरी मॅडम श्री. एस. डी. पाटील सर मोरगाव व तालुक्यातील बहुसंख्येने पदवीधर उपस्थित होते.



