रावेर; आज दि. १३ मार्च रोजी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ(RMBks) द्वारे रावेर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त असे की, रा. मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा वामन मेश्राम साहेब तथा रा. कार्याध्यक्ष पी.एन. सोलंकी; प्रदेश अध्यक्ष राजेद्र राजदीप यांच्या आदेशान्व रा. मुनि. बहुजन कर्मच्यारी संघ रावेर जि. जळगांव निवासी नायब तहसिलदार यांना विविध विषयांचा अनुशंगाने निवेदन सादर करण्यात आले.[ads id="ads1"]
हे आंदोलन १)जुनी पेशन लागुकरा २) नविन चार कामगार संहीता रद्द करा . ३) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रद्द करा ४) केन्द, राज्य यांच्या अखत्यारित असलेली विद्यापीठ ऑटोनामस करु नका ५) अंशकालीन व करार पद्धतीने घेतलेले कर्मचारी नियमीत करा ६) सरकारी उद्योगाचे खाजगी करण थांबवा व केलेले खाजगी करण रदद करा ७) अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची फेलोशीप अदा करा इ. मागण्याण सह आर. एम.बी.के. एस . चे निवेदन महाशय ना . तहसिलदार यांना सादर करणात आले.[ads id="ads2"]
यावेळी उपस्थित प्रोटॉन चे तालुका अध्यक्ष उमेश दांडगे सर शौकत तडवी भारतमुक्ति मोर्च्याचे महेश तायडे व इतर शासकीय निमशासकीय कर्मच्यारी उपस्थित होते