ऐनपूर येथील जल जिवन मिशन चे काम पडले बंद .....नागरीक पडले संभ्रमात .....कारण गुलदस्त्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपुर येथे शासनाने प्रत्येक घरात पाणी पोहचले पाहिजे या अनुषंगाने जल जिवन मिशन ही योजना मंजूर करून या योजने मार्फत पाण्याची टाकी बांधकाम सुरू केलेले आहे काही दिवसांपूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकीचे काम सुरु केले होते परंतु नंतर हे काम अचानक बंद करण्यात आले काम बंद का पडले या मुळे ऐनपुर येथील नागरीक संभ्रमात पडले आहे.[ads id="ads1"]  

सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचे टाकीचे  काम सुरू झाले होते  परंतु  हे काम अचानक पणे  आता बंद आहे जल जीव मिशन ही योजना भारत सरकारची मुख्य योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येक गावात प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देणे असेआहे या संकल्पनेतुन 2024 पर्यत गावा गावात ही योजना पुर्ण राबवायची आहे.[ads id="ads2"]  

परंतु ऐनपुर येथे  सुरु झालेले काम बंद करण्यात आले आहे हे काम केव्हा सुरु होईल यांची गावातील नागरीक मोठ्या अतुरतेने वाट पाहत आहे परंतु राजकीय हेवेदावे मुळे हे काम बंद पडले आहे का? ऐनपुर येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपले प्रतिनिधी पाठवले आहे ग्रामपंचायत चे सरपंच व सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे का? त्यांच्यातील हेवेदावे यामुळे तर काम बंद पाडले नाही ना ? किंवा ज्या कंत्राटदारांना हे काम देण्यात आले आहे त्यांच्या आर्थिक नियोजनामुळे तर काम बंद आहे असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत असे गावांतील नागरीक चर्चा करीत असतांनाच दिसत आहे प्रत्येकाने गावातील राजकारण बाजूला ठेवून होत असलेल्या कामाला सहकार्य करावे यामुळे आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे  प्रत्येकाला मुबलक व शुद्ध पाणी मिळावे या करता बंद पडलेले काम पुन्हा जोमाने सुरू करण्यात यावे व नागरीकाचा संभ्रम दूर करावा अशी अपेक्षा ऐनपुर येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया क्र. १) अमोल महाजन सरपंच ऐनपुर 

जल जिवन मिशन योजनेची मंजुरी मिळाली असून प्रशासकीय मान्यता मिळताच कामाला सुरुवात केली होती परंतु काही दिवसांपासून काम कंत्राटदारानी बंद पाडले आहे याबद्दल कंत्राटदाराना काम का बंद आहे अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले काही तांत्रिक अडचणी येत आहेत थोड्या दिवसांनी कामाला सुरुवात होईल.


प्रतिक्रिया क्र २) दिपाली कोतवाल गटविकास अधिकारी रावेर 

यांना दुरध्वनी वरून संपर्क साधला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही 


प्रतिक्रिया क्र ३) नारायण गायकवाड कंत्राटदार जल जिवन मिशन

ऐनपुर येथील जल जिवन मिशन योजनेच्या कामाची प्रशासकिय मान्यता मिळताच कामाला सुरुवात केली होती परंतु शासकिय अधिकारी व कर्मचारी हे संपावर गेल्याने याठिकाणी स्थानिक पातळीवर काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या संप मिटला असून याबाबत प्रशासकिय अधिकारी यांच्या सोबत बोलणार असून लवकरच कामाला सुरुवात होईल

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!