बिबट्याच्या हल्यात डीएससी जवान जखमी : आयुध निर्माणी वसाहतीतील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


याच वसाहतीत महिनाभरात दोन बिबट्याला वन विभागाने केले होते जेरबंद

 भद्रावती (अतुल कोल्हे)

               आयुध निर्माणी चांदाच्या डी एससी वसाहतीत सकाळी फिरायला फिरायला निघालेल्या एका डीएससी जवानावर बिबट्याने हमला करून जखमी केले. सदर घटना सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास  घडली.[ads id="ads1"]  

   आयुध निर्माणीच्या डीएससी सुरक्षा कंपनीतील ५१ वर्षीय सुभेदार जोगिंदर चव्हाण असे या बीएससी जवानांचे नाव असून ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बीएससी कॉलनीतील रस्त्याने फिरायला निघाले असता अचानक त्यांच्यावर बिबट्याने हमला करून त्यांना जखमी केले. त्यात त्यांच्या डोक्याला, मानेला, खांद्याला व पाठीला दुखापत झाली असून त्यांच्यावर आयुध निर्मानीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.[ads id="ads2"]  

   या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे व वनरक्षक धनराज गेडाम व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या परिसरात वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसविण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!