फैजपुर नगरपालिका हद्दीत वैशिष्ट्यपूर्ण काम योजनेअंतर्गत ठेकेदाराला एकूण 7 लाखाची अतिरिक्त रक्कम दिल्याचा चौकशी अहवाल प्राप्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

अपहारात समाविष्ट अधिकारी,कर्मचारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्याची तक्रारदार ललित कुमार चौधरी यांची मागणी

यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील फैजपुर नगरपालिका हद्दीतील वैशिष्ट्यपूर्ण काम योजनेअंतर्गत कामात गैरप्रकार,भ्रष्टाचार,झाल्याची तक्रार फैजपूर येथील ललित कुमार चौधरी यांनी केली होती त्यानुसार जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जळगाव तथा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये फैजपुर नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे, फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दिलेल्या चौकशी अहवालात म्हटले आहे की, फैजपूर नगरपरिषद हद्दीतील पाईपलाईनच्या कामांमध्ये प्रत्यक्ष अदा केलेले देयक व प्रथम दर्शनी पाहणी झाल्यानुसार संबंधित ठेकेदाराला एकूण अतिरिक्त रक्कम 7 लाख 19 हजार 735 रुपये दिल्याचे दिसून येत आहे.[ads id="ads1"]  

      जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष व सचिव तथा जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे फैजपूर नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे तसेच फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दि. 30 जानेवारी 2023 रोजी आपली स्वाक्षरी करून दिलेल्या चौकशी अहवालात नमूद केल्यानुसार कामाच्या अपोहारात समाविष्ट अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही करणे बाबत ललित कुमार चौधरी यांनी दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.त्यानुसार जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष,सचिव व सदस्य यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही काय करणार..? याकडे फैजपूर शहरासह संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads2"]  

यावल नगरपरिषद अभियंता शेख यांचा फैजपुर नगर परिषदेत सुद्धा प्रताप

       यावल नगरपरिषद बांधकाम अभियंता शेख सईद शेख अहमद यांच्या कार्यकाळात यावल नगर परिषदेत 50 % कामांमध्ये काय काय प्रताप झाले आहेत आणि त्याचे परिणाम आज यावलकरांना काय काय भोगावे लागत आहेत हे आजी माजी सर्व नगरसेवकांना आणि नागरिकांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे असे असताना शेख सईद हे फैजपूर नगर परिषदेत प्रभारी अभियंता असताना त्यांच्या हस्ते कामाच्या नोंदी करण्यात आल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदाराला एकूण अतिरिक्त रक्कम 7  लाख 19 हजार 735 रुपये दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे फैजपूर नगरपरिषद तत्कालीन प्रभारी कनिष्ठ अभियंता शेख सईद ( तथा यावल नगरपरिषद कनिष्ठ अभियंता शेख सईद ) यांनी फैजपूर नगरपरिषद मध्ये सुद्धा कार्यालयीन कामकाजात चांगलाच प्रताप केल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!