रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
दिनांक 10 मार्च 2023शुक्रवार रोजी डॉ. दीपक वर्मा MBBS आहे.ते राहणार मलकापूर येथील रहिवासी असून त्यांनी रावेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपुर येथे 10मार्च रोजी जबाबदारी स्वीकारून नुकताच पदभार सांभाळला.[ads id="ads1"]
प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर येथे सीनियर MD डॉक्टर महाजन सर चार ते पाच वर्षापासून रुग्णांना सेवा देण्याचे काम चांगल्या प्रकारे करीत आहेत. तसेच वाढत्या पेशंटचा विचार केला असता प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर येथे दोन डॉक्टरांची गरज भासत असल्यामुळे नुकतीच 10 मार्च रोजी MBBS डॉ दीपक वर्मा यांनी नुकताच पदभार स्वीकारला.[ads id="ads2"]
त्याबद्दल, त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपुर येथे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी आरोग्य सहाय्यक श्री मधुकर पवार यांनी डॉक्टर दीपक वर्मा यांचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच आरोग्य सहायिका श्रीमती चारोशीला पाटील कनिष्ठ सहाय्यक श्री शब्बिर तडवी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री प्रवीण चौधरी श्री संजय पाटील ड्रायव्हर बाळू भाऊ महा लॅब श्री विशाल पाटील इत्यादी शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते.