यावल (सुरेश पाटील) यावल भुसावळ रोडवरील अकलूद शिवारातील पोदार शाळेतील इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. [ads id="ads1"]
इयत्ता ४ थीचा विदयार्थी कुमार कुश महेन्द्र चौधरी याने २०० गुणांपैकी १७० गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला व तो राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे.[ads id="ads2"]
तसेच कुमार हर्षवर्धन गणेश धुमाळ या विद्यार्थ्याने २०० गुणांपैकी १५५ गुण प्राप्त करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून तो राज्यात सतराव्या क्रमांकावर आहे दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी कौतुक केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.