ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी समिती मार्फत "पगारदार व्यक्तींसाठी आयकर नियोजन" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत मा. प्रा. श्री निखिल वायकोळे, डी. एन. महाविद्यालय फैजपूर यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात त्यांनी कर प्रणालीचे नियोजन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. श्री श्रीराम नारायण पाटील हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री संजय वामन पाटील हे होते. कार्यशाळेचे सुत्रसंचलन डॉ सतिश वैष्णव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस पी उमरीवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ के जी कोल्हे, प्रा जयंत नेहेते, प्रा हेमंत बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.