भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भुसावळ शहर पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.[ads id="ads1"]
सागर दिलीप देहाडे असे मयत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मयत सागर दिलीप देहाडे हे एवढे 32 वर्षाचे होते. सागर दिलीप देहाडे हे नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी पोलिस ठाण्यात आला. हजेरी मस्टरवर एन्ट्री करुन समंस बजावणीसाठी निघाला. तेवढ्यात छातीत दुखू लागल्याने तेजागीच बसला. त्याला तातडीने ट्रामा केअर सेंन्टरला दाखल करण्यात आले.[ads id="ads2"]
त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने गोदावरी हॉस्पिटल (Godavari Hospital) येथे नेत असतांना रस्त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मालविली. मयत सागर याच्या पश्चात गरोदर पत्नी, मुलगा असा परीवार आहे. दरम्यान, कामाचा अधिक ताण आणि जेवण वेळेवर असल्याने आणि अपुर्ण झोप यामुळे अशा घटना घडत असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. जळगाव येथे मुळ घरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


