रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील उटखेडा (Utkheda,Taluka Raver Dist Jalgaon) येथील किशोर देविदास पाटील यांची मोटारसायकल रावेर येथून बुरहानपूर रोडला असलेल्या मामाश्री हॉटेल समोरून १ फेब्रुवारी २०२३ रोजी चोरीस गेलेली होती. रावेर पोलिस स्टेशन ला(Raver Police Station) सदर चोरीची तक्रार करण्यात आली होती.[ads id="ads1"]
पोलीस मोटर सायकल चोराचा कसून शोध घेण्यात येत होता. या गाड़ी चोराची रावेर पोलिस स्टेशन चे (Raver Police Station) पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रावेर पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील एक ४० हजार किमतीची मोटरसायकल हिरो होंडा डीलक्स (लाल काळ्या रंगाची)आरोपी जाड्या उर्फ गुड्ड्या कुवरसिंग बारेला राहणार खाऱ्या काकोडा खरगोन तालुका झिरन्या जिल्हा मुक्काम मंगरूळ तालुका रावेर यांच्याकडेच असे बाबत माहिती मिळाल्याने रावेर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक व पोलीस नाईक अतुल तडवी, पोलीस नाईक सुरेश मेढे, [ads id="ads2"] पोलीस अमलदार समाधान ठाकूर, अमोल जाधव, सचिन घुगे, विकारुद्दीन शेख सुकेश तडवी, प्रमोद पाटील विशाल पाटील यांनी आरोपिताचा शोध घेता आरोपी हा मंगरूळ येथे मिळून आरोपील पोलीसांनी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखा बोलू लागला त्याने मोटार सायकल चोरीची कबुली दिली. त्यास मोटर सायकल सह ताब्यात घेऊन रावेर पोलीस स्टेशन (Raver Police Station) येथे सदर आरोपी यांना अटक करण्यात आली आहे व मुद्देमाल पुढील कारवाई कामी रावेर पोलीस स्टेशनला हजर केले आहे.


