यानुसार पूर्वापार स्रियांना भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान दिले गेले आहे. पण ते या श्लोका पुरतेच मर्यादित न ठेवता समाजाने त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. असे सांगितले.[ads id="ads1"]
जागतिक महिला दिनानिमित्त साळवे इंग्रजी विद्यालयात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महिला शिक्षिका व विद्यार्थ्यांनींच्या हस्ते दिपप्रज्वलन करून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिकाभघिणींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस डी मोरेसर यांनी केले. नारी शक्ती जगात भारी,का समजता तिला बिचारी. म्हणूनच स्रियांनी स्वतःमधील गुण ओळखून येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे. स्वतःला मुक्तपणे व्यक्त करावे. तरच महिला दिनाचा हेतू साध्य होईल असे सांगितले. आभारप्रदर्शन बी आर बोरोले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस व्ही राठोड, अक्षय ढाकेसर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.