रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रसायन शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस एन वैष्णव यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि एक आदर्श महिला म्हणून विकास करा असे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले.[ads id="ads1"]
तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांनी भारतातील महिलांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नीता वाणी यांनी आजही महिलांमध्ये लिंगभेद केला जातो असे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले. तसेच महिला कार्यक्रम अधिकारी व मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. रेखा पी. पाटील यांनी लिंग समानता याविषयी अमोल असे मार्गदर्शन केले. आजही आपल्या समाजामध्ये लिंगभेद केला जातो. असे त्यांनी सांगितले. [ads id="ads2"]
आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. तसेच निशा अवसरमल या विद्यार्थिनीने महिला दिना वर आधारित कवितेचे वाचन केले.या कार्यक्रमाला 88 विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
>>>हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त
>> हेही वाचा : सावद्यात ट्रॅक्टरने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू
>>>हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार
>>>हेही वाचा :- ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम करणाऱ्या प्राैढ मजुराचा विहिरीत उतरताना हात निसटल्याने विहिरीत पडून मृत्यू
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. व्ही.एन.रामटेके डॉ. डी.बी.पाटील, प्रा.एस.पी.उमरिवाड डॉ.एस.एन.वैष्णव प्रा.प्रदीप तायडे,प्रा.नरेंद्र मुळे, प्रा.अक्षय महाजन प्रा.ज्ञानेश्वर कोळी यांनी परिश्रम घेतले.शेवटी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.