यावल (सुरेश पाटील)
यावल ते कोरपावली जुन्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने यावल कोरपावली जुना रस्ता ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत मंजुरी मिळणेसाठी संबंधित 44 शेतकऱ्यांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.[ads id="ads1"]
आमदार शिरीषदादा चौधरी यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी खुपच अडचण निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना जाणे येणे,शेती माल,केळी वगैरे वाहतुक करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने व कोरपावली जुना रस्ता हा अत्यंत खड्डेमय झाल्याने मोठ्या अडचणी येत आहेत.तरी या रस्त्याचे काम तात्काळ मंजूर होण्यासाठी आपल्या आमदार निधीतुन रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा नियोजन समितीला मंजुरी द्यावी.[ads id="ads2"]
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर प्रदीपसिंह पाटील,संजय बारी,अल्ताफ कच्ची,विलास पंडित,अर्जुन बारी,प्रवीण बोरोले,युवराज बोरोले,मुख्तार पटेल,प्रकाश मोरे,सुशीलकुमार नागराज, महेंद्र सावखेडकर,सुधाकर धनगर,बिस्मिल्ला खान, दिलीप राणे,फारुख शेख, आरिफ शेख,रमेश कोळी, राजू तडवी,रवींद्र सोनार, वसंतशेठ बडगुजर,अशोक पंडित,अमोल नेहेते,रवींद्र मोरे,संजय मोरे,नितीन भोईटे,किरण पवार,दीपक पवार,असगरखान अयुब खान यांची स्वाक्षरी आहे.