काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ईव्हीएम भांडाफोड करणारी परीवर्तन यात्रेला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद..!
धरणगाव प्रतिनिधी: भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक, अध्यक्ष मा. वामन मेश्राम व सहकारी यांच्या माध्यमातून ईव्हीएमचा भंडाफोड करणारी देशव्यापी परिवर्तन प्रवास (यात्रा भाग २) काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत निघाली आहे. शुक्रवार रोजी धुळे जिल्ह्यातून निघालेली परीवर्तन यात्रा पिंप्री ता धरणगाव येथे आगमन झाल्यावर ,भारत मुक्ती मोर्चा प्रदेश सचिव मोहन शिंदे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुकाध्यक्ष निलेश पवार, व्याख्याते ॲड.रविंद्र गजरे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा सिराजभाई, अलाउद्दिन खाटीक, खंडू शिंदे , भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष गौतम गजरे , तसेच प्रकाश लोखंडे , नाना बडगुजर ,सरला बडगुजर ,सरला लोखंडे , कृष्णा मोरे , विनोद बीजबीरे , मनोज बीजबीरे , सुशील तायडे , गौतम दोडे , ताराचंद सोनवणे , कृष्णा कुऱ्हाडे , शुभम नरवाडे , शुभम दोडे , सुभाष सोनवणे , सतिष शिंदे आदींनी स्वागत केले . तत्पूर्वी गावात मा वामन मेश्राम साहेबांची ढोल ताशांच्या गाजरात रॅली काढण्यात आली .प्रसंगी मा वामन मेश्राम साहेबांच्या हस्ते कालकथीत युवा वक्ते किरण शिंदे सर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले .[ads id="ads1"]
वामन मेश्राम यांनी राजकीय क्षेत्रात कार्य करणारे बुद्धिजीवी व राजनीतिक नेत्यांना ईव्हीएम मशीनच्या गडबड घोटाळ्यांची माहिती आहे व ईव्हीएम संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती देशातील सर्वसामान्य असलेली बोली जनतेला माहिती नाही. ईव्हीएम च्या माध्यमातून लोकशाहीची हत्या सुरू आहे. मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केले जात आहे. सरकारी उद्योग कवडीमोल भावात उद्योगपतींना विकले जात आहेत. त्याचप्रमाणे लागेबांधे असणाऱ्या उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्यात आली. खाजगीकरणामुळे आरक्षण शून्य झाले सर्व सामान्यांचे रोजगार संपला. [ads id="ads2"]
शासकीय कर्मचाऱ्यांच्या फायद्यात असणारी जुनी पेन्शन व सामाजिक योजना देखील बंद करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्राकडून कोणतेही हालचाली केले जात नाही. स्वातंत्र्याचे ७५ वर्षानंतर सुद्धा ओबीसींची निश्चित संख्या नसल्याचे कारण सांगून जनगणना होत नाही. ओबीसींसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही व ओबीसींना हक्क अधिकाऱ्यांपासून सुद्धा वंचित ठेवण्याचे कार्य केंद्राकडून केले जात आहे. ईव्हिएम व विविध समस्याबाबत वामन मेश्राम यांनी राष्ट्रीय परिवर्तन ईव्हीएम भांडाफोड यात्रेच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले केले. यावेळी बामसेफचे वरिष्ठ पदाधिकारी सुमित्र अहिरे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, भारत मुक्ती मोर्चाचे मोहन शिंदे, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र वाघ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.