ऐनपूर येथील सरदार पटेल प्राथमिक विद्यामंदिरात बक्षिस पारितोषिक वितरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

    ऐनपूर ता.रावेर- येथील सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिरात स्नेहसंमेलन (सप्तरंग-२०२३)व क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण संस्थाध्यक्ष भागवत पाटील यांचे अध्यक्षतेत करण्यात आले.[ads id="ads1"]  

  दिपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक शुभम महाजन सर यांनी तर स्वागत शाळेचे उपशिक्षक अक्षय पाटील यांनी केले. सप्तरंग या स्नेहसंमेलन कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून संस्थाचालकांनी तसेच गावातील लोकांनी विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम दिली होती. ती विद्यार्थ्यांना रोख रक्कम न देता त्या रक्कमेतून शालेय जीवनातील एक आठवण रहावी म्हणून ट्रॉफी खरेदी करुन ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.[ads id="ads2"]  

  तसेच क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.तसेच शिक्षकांची मेहनत बघता त्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष रामदास महाजन,सचिव संजय पाटील व संचालक पी.आर.चौधरी,एन.व्ही.पाटील, डॉ. सतिष पाटील,कैलास पाटील, सहसचिव आर.एस. पाटील हे होते.

हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार

सूत्रसंचालन निकिता चौधरी यांनी केले.तर आभार अश्विनी चौधरी यांनी मानले.यावेळी रामदास महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!