रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दि. ०४/०३/२०२३ रोजी रावेर येथील महावितरण उपविभागीय कार्यालयामधील जागतिक लाईनमन दिना निमित्त व राष्ट्रीय सुरक्षा दिना निमित पहिला लाईनमन दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान उपकार्यकारी अभियंता माननीय अनिल पाटील साहेब व मुख्य अतिथी म्हणून सावदा डिव्हिजन ऑफिस चे भूषण तळेले साहेब उपस्थित होते.[ads id="ads1"]
तसेच सदर ठिकाणी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे सत्कार करण्यात आले त्यानंतर प्रत्येक कक्षाचे लाईनमन यांचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले त्यानंतर कक्ष अभियंता व सहाय्यक लेखापाल यांच्याकडून लाईनमन दिवस व सुरक्षा व काम करतांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.[ads id="ads2"]
सदर दिवस हा लाईनमन लोकांचा असून प्रत्येक कक्षमधून किमान एका जनमित्राने तरी आपले मनोगत व्यक्त करावे अशे अध्यक्षाने सुचवले असता तेथे श्री.बी.सी.साळुंके, पि. पि. महाजन, अमोल हिवरे, अर्जुन कचरे, लिलाधर कोळी, विकास पाटील, विनोद हिवराळे, कोमल बान्हे, जीवन निंभोरे, मिनाक्षी इंगळे, तुषार चौधरी यांनी विज यंत्रणेवर काम करीत असताना येणाऱ्या अडचणी या बाबत मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार
या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे सुनील तावडे, गणेश चौधरी, बि.सी. साळुंके, निलेश महाजन यांनी परिश्रम घेतले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समीर तडवी साहेब ( सहा.अभियंता ) यांनी केले आणि आभार दिलीप सुंदराणी साहेब यांनी मानले या कार्यक्रमास भरत महाजन यांनी लाईनमन यांना टेस्टर वाटप केले.