आदिवासी तडवी भिल समाज जोडो पदयात्रेचा लोहारा येथे थाटात स्वागतोत्सव : तडवी समाजाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड याकुब तडवी समाज जोडो पदयात्रेत सहभाग

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर/मुबारक तडवी

लोहारा गावातील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात समाज जोडो पदयात्रेचे प्रणेते मुनाफ जुम्मा तडवी सद्दाम कवी जहांगिर तडवी फिरोज तडवी आदीसह पदयात्रेततील सहभागी समाज बांधवांचे भल्या मोठ्या गुलाबपुष्प हार देत लोहारा वासियांनी जंगी स्वागत केले.[ads id="ads1"]  

   समाजप्रतीचा असलेले प्रेम सहानुभूती शरीरातील धमनीत रुजलेले आदिवासी तडवी भिल समाजाचे समाजसैनिक मुनाफ जुम्मा तडवी यांनी प्रारंभ केलेले समाज जोडो यात्रेचे तडवी भिल समाजाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड याकुब तडवी साहेब यांनी कौतुक व स्वागत केले तसेच समाज जोडो पदयात्रेत सर्व समाज बांधवांनी सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन केले.[ads id="ads2"]  

   यावेळी लोहारा येथे पदयात्रेत लोहारा गावाचे माजी सरपंच लियाकत तडवी संजू जमादार उपसरपंच मजिद तडवी ग्रामपंचायत सदस्य सद्दाम तडवी असलम सलीम तडवी संजीव रमजान हमीद तडवी जावेद तडवी तसलीम तडवी कुसूंबा वाघोदा पत्रकार मुबारक तडवी पत्रकार मासूम तडवी नशिर तडवी बबलू तडवी आदिसह बहुसंख्येने तडवी समाज बांधव या समाज जोडो पदयात्रेत सहभागी झाले.

हेही वाचा:- स्कूल बसचा अपघात : ३० विद्यार्थी जखमी : जळगाव जिल्ह्यातील घटना

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील तरुणाची आत्महत्या

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!