ट्रक चालकाला मारहाण करीत लूटले : चार संशयिताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : रावेर शहरातील (Raver City)  बऱ्हाणपूर रोडवरील गोपी तोल (Gopi Tol Kata) काट्याजवळ एका ट्रक चालकाला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातून दोन हजार रुपयांची रोकड हिसकावण्यात आली. या प्रकरणी  रावेर पोलिस स्थानकात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]  

दोन हजार रुपये लुटीत केले गुल 

ट्रक चालक (Truck Driver)  मोहम्मद मोहसीन मोहम्मद आमद वय - 30, राहणार - फैजपूर) हे गुरुवार, 30 मार्च रोजी सकाळी सायंकाळी 6.30 वाजता रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील गोपी तोल काट्याजवळ ट्रक घेवून आले असता संशयित रावेर शहरातील शेख रशीद शेख मेहमूद व त्याचा मुलगा, शेख बाशीद शेख रशीद (दोघे रा. रावेर), सद्दाम मणियार आणि त्याच्यासोबत असलेला एक जण अशा चौघांनी [ads id="ads2"]  ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड हिसकावत ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. या संदर्भात मोहम्मद मोहसीन मोहम्मद आमद यांनी रावेर पोलिसात तक्रार दिल्यावरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास रावेर पोलिस स्टेशन  चे (Raver Police Station) पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.

हेही वाचा:- स्कूल बसचा अपघात : ३० विद्यार्थी जखमी : जळगाव जिल्ह्यातील घटना

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील तरुणाची आत्महत्या

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!