रावेर शहरातील विवाहितेने गळफास घेवून संपविली जीवन यात्रा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर शहरातील विवाहितेने गळफास घेवून संपविली जीवन यात्रा


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
रावेर शहरातील वासुदेव नगरातील (Vasudeo Nagar,Raver)  रहिवासी सिताराम काशिनाथ पाटील यांची मुलगी प्राजक्ता हिचे लग्न सात महिन्यापूर्वी उमरेड जिल्हा नागपूर (Umred Dist Nagpur) येथील भरतकुमार पाटील यांच्याशी झाले होते. दोन महिन्यापूर्वी विवाहिता ही रावेर (Raver)  येथे वडिलांच्या घरी आली होती.
[ads id="ads1"]  

   गुरुवारी तिचे आई-वडील चिनावल (Chinawal Taluka Raver) येथे कामानिमित्त गेल्याने प्राजक्ता घरी एकटीच होती. तिने घराच्या वरील मजल्यावरील बेडरूम मध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. [ads id="ads2"]  

  डी.वाय.एस.पी. डॉ. कुणाल सोनवणे, रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (Raver Police Station PI) कैलास नागरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.शवविच्छेदन  रावेर ग्रामीण रुग्णालयाचे (Raver Rural Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी.महाजन यांनी केले. आत्महत्या पूर्वी विवाहितेने लिहून ठेवलेले चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला.

हेही वाचा:- स्कूल बसचा अपघात : ३० विद्यार्थी जखमी : जळगाव जिल्ह्यातील घटना

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील तरुणाची आत्महत्या

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!