नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या मौजे रोहिले बुद्रुक येथील दलित वस्ती योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन ग्रामपंचायतीच्या सरपंच ठकुबाई देविदास पवार उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.[ads id="ads1"]
नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील मौजे रोहिले बुद्रुक येथे दलित वस्ती योजना अंतर्गत सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर झाला असून या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे दिनांक 30 मार्च 2023 रोजी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ठकुबाई देविदास पवार, उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल यांच्या हस्ते श्रीफळ फोडून दलित वस्ती योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भगवान जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल, रामदास सावळीराम पवार , कडूबाई मच्छिंद्र पवार आदी ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहून रस्त्याचे कामाचे श्रीफळ फोडून भूमिपूजन केले. तसेच या भूमिपूजनाच्या वेळी गावातील मच्छिंद्र कारभारी पवार, अनिल केशव बागुल, अण्णा साहेबराव पवार, संतोष केशव बागुल, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल संताराम अरबूज, ठेकेदार शरद लालचंद पवार व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



