नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील बोलठाण येथील कृषी उत्पन्न उप बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अत्यंत कमी भाव मिळाल्याने कांदा मार्केट ऑफिस समोर शेतकऱ्यांनी चक्क कांदा ओतून निषेध व्यक्त केला.[ads id="ads1"]
दिनांक 29 मार्च 2023 रोजी बुधवारी कृषी उत्पन्न उप बाजार समिती बोलठाण येथे कांद्याला अवघा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांकडून बोलठाण उपबाजार समितीच्या ऑफिस समोर चक्क कांदा जमिनीवर ओतून निषेध व्यक्त करण्यात आला . दिनांक 28 मार्च 2023 रोजी मंगळवारी देखील याच कारणाने कांदा लिलाव बंद करण्यात आला होता. [ads id="ads2"]
तरीदेखील दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मार्च 2013 रोजी बुधवारी पुन्हा सकाळी कांदा लिलाव नव्याने सुरू झाल्यानंतर देखील व्यापाऱ्यांनी कांद्याला अवघा पन्नास रुपये ते शंभर रुपये लिलाव पुकारला नाही शेतकऱ्यांचा राग अनावर शेतकऱ्यांनी बोलठाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट ऑफिस समोर कांदा जमिनीवर ओतला व निषेध व्यक्त केला. याप्रसंगी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यापाऱ्यांचा आणि मार्केट कमिटीचा निषेध व्यक्त केला.



