नांदगाव तालुक्यातील डॉक्टर वाडी येथील सौरऊर्जा कंपनीला सील ; वनविभागाच्या दक्षता पथकाची कारवाई, प्रकल्पाचे कामकाज थांबविले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नांदगाव -प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील वन विभागाच्या नियतन क्षेत्रात सौर उर्जेवर आधारित विद्युत प्रकल्प उभारणाऱ्या टी.पी. सौर्या कंपनीवर नाशिक वन विभागाच्या पूर्व आणि वनरक्षता पथकाने संयुक्त कारवाई करत कंपनीच्या प्रकल्पातील विविध साहित्य सामग्री व्यक्त करत कंपनीला सील ठोकले. दिनांक 27 मार्च 2023 रोजी सोमवारी कंपनीच्या खाजगी ब्राउसरकडून वन विभागाच्या कारवाईला अडथळा आणला होता. [ads id="ads1"]  
  त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 28 मार्च 2023 रोजी मंगळवारी वनविभागाच्या मोठ्या लव्या जुमयासह 100 जणांचा समावेश असलेल्या दक्षता पथकाने कठोर कारवाई केली. यापुढे प्रकल्प बंद ठेवण्याची कंपनीच्या व्यवस्थापनाने कारवाईनंतर वन विभागाला दिली. वनविभागाच्या कठोर कारवाईमुळे नांदगाव तालुक्यात खळबळ मोठी उडाली आहे.[ads id="ads2"]  
         नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी पांझण शिवारातील वन जमिनीवरील टी.पी. सौर ऊर्जा कंपनीच्या प्रकल्पाची अतिक्रमण मागील दोन महिन्यापासून गाजत आहे ‌ नाशिकचे विभागीय वन अधिकारी यांनी मंगळवारी दिनांक 28 मार्च 2023 रोजी सकाळी वनाधिकारी व 150 कर्मचाऱ्यांसह 200 पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा डॉक्टर वाडी - पांझण शिवारात धडक दिली. येथील सुमारे दोनशे कोटी रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्पाला वारंवार लेखी सूचना देऊन देखील काम न थांबणाऱ्या टी.पी. सौंर्या यांचे मौजे डॉक्टर वाडी, बाभुळवाडी सोलर प्रकल्पास भेट देऊन सदर प्रकल्प सील बंद करण्यात आला. वन जमिनीवर अतिक्रमण करत व्यावसायिक वापर करणाऱ्या खाजगी कंपनीला पहिल्यांदाच वन विभागाने अशाप्रकारे दणका दिल्याने नांदगाव तालुक्यात एकच उडाली आहे. नांदगाव वनपरिक्षेत्रातील डॉक्टरवाडी - पांझण असलेल्या वन जमिनीवर टी.पी. सौर्या या कंपनीने सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. पांझणला वनिता पथकाने दोन दिवसापूर्वी छापा टाकून व नकाशा क्रमांक 489 मधील वन जमिनीवर अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या संस्थेचा विरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच जेसीबी, ट्रॅक्टर देखील जप्त केले होते. तरीदेखील या ठिकाणी प्रकल्प उभारणीचे काम सुरूच असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी संपूर्ण प्रकल्प सील करण्याचे आदेश विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना दिले. विशाल माळी यांनी याप्रकरणी नियोजन करत मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी सकाळी नांदगाव, चांदवड, येवला वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी कर्मचारीसह नाशिक, वणी, अहमदनगरचे वन फिरते पथकाची (दक्षता) अतिरिक्त कुमक 150 ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा घेऊन सकाळी दहा वाजता धडक दिली. यावेळी तातडीने सर्व प्रकल्प जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. सदर प्रकल्पाचे सर्व साहित्य जप्त करून सील करण्यात आले. पुढील आदेश होईपावेतो प्रकल्प बंद ठेवणे कामी कंपनीकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले.
         सदर कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक मनमाड श्री सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव (प्रा) अक्षय म्हेत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी चांदवड (प्रा) श्री संजय वाघमारे, दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री संजय पवार, श्री राहुल घरटे, व श्री रवींद्र भोंगे, तसेच मनमाड उपविभागातील व दक्षता पथकाचे वनपाल, वनरक्षक व वनमजूर असे एकूण शंभरच्या वर अधिकारी कर्मचारी सहभागी होते. तसेच निवासी नायब तहसीलदार नांदगाव श्री चेतन कोनकर, आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!