----------------------------------------
"वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे अधीकतर वाहनांना नंबर प्लेट नसते.तसेच ही वाहने रस्त्यावर सामान्य नागरिकांचा कोणताही विचार न करता बरेचसे चालक दारुच्या नशेत भरधाव वेगाने धावत असतात.याकडे जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सह महसुली व पोलीस विभागचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे."
----------------------------------------[ads id="ads1"]
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
रावेर तालुक्यातील सावदा व परिसरात स्थानिक महसूल व पोलीस यत्रंणामधील कर्मचाऱ्यांकडून अवैध वाळूची वाहतूक बाबत शुन्य कारवाई मुळे की काय?मात्र वाळू तस्करांना कायद्याचा कोणतच धाक अजिबात उरलेला दिसून येत नाही.म्हणून शासनाकडून बंदी असूनही वाळूची अवैधरित्या वाहनाद्वारे खुलेआम तस्करी सावदा व परिसरात जोमाने होत असल्याने यंत्रणा असूनही नसल्यासारखी वाटते असे सुज्ञनागरीकांकडून बोलले जात आहे.[ads id="ads2"]
दररोज रात्री ज्या वेळी जनता साखरझोपेत असतात त्यावेळी वाळूची अवैधरित्या ट्राकटर, महेंद्रा पिक्प या वाहनाद्वारे अधीक चोरटी वाहतूक व तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात केला जात असून, शनीवार,रविवार सह शासकीय सटी असलेल्या दिवशी तर हा कारभार रात्रंदिवस जोमाने सुरू असतो.सदरील व्यवसाय शहरातील दिनकर व संजू नामक व्यक्ती यांच्या मार्फत केला जात असून ही अवैध वाळूची पावती नंदुरबार येथील असते,मात्र वाळू जळगाव सह रावेर तालुक्यातील नद्या-नाल्यातून आणली जात असल्याची माहिती एका वाळूच्या व्यवसायाशी संबंधितांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.तसेच शहर व परिसरात यामुळे उघडपणे वाळूचे ढिग देखील दिसून येते.सावदा तलाठी कार्यालयाच्या समोर व हाकेच्या अंतरावर बस स्थानक कडे जाणाऱ्या रस्त्यावर थेट क वर्ग नगरपालिकेच्या काही अंतरावर वैध की अवैध हे चौकशीचा भाग आहे.मात्र सदर ठिकाणी प्रथम दर्शनी सुरु असलेल्या तळघराचे बांधकामासाठी वाळू व खडीचे पडलेले ढिग थेट रहदारीस मोठा अडथळा ठरत असूनही याकडे संबंधित तलाठी,मंडळ अधिकारी सह पालिका प्रशासनाचा कानाडोळा बरेच काही सांगून जाते.या बाबत समक्ष भेटून विचारले असता अवैध वाळू वाहतूक वर लगाम लावण्यासाठी पथक नेमले आहे.तरी माझ्या नजरेत असा प्रकार आपल्यास मी सोडणार नाही.वगैरे उत्तर सावदा तलाठी यांनी देऊन फक्त वेळ काढूपणा केला.तरी याकडे थेट रावेर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी हमखास लक्ष देवून स्वत:आपल्या स्तरावर सावदा व परिसरात येवून चौकशी केल्यास अनेक ठिकाणी सुरू असलेले नविन बांधकाम जवळ वाळूचे ढिग त्यांना दिसून येतील, यानंतर अवैध वाळू उपसा व वाहतूकवर प्रतिबंध घालण्यासाठी महसूल विभागा मार्फत या परिसरासाठी नेमण्यत आलेले पथक सह संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांची असंवेदनशील शुन्य कामगिरी म्हणजे शासकीय कामात निष्काळजीपणा दिसून आल्याचा अहवाल जर जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे त्यांनी पाठवले तर सदरील पथक व तलाठी,मंडळ अधिकारी यांच्यावर म.ना.से(शिस्त व अपील)१९७९ चे कलम अन्वे निलंबनाची कारवाई नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही.असे देखील जाणकारांकडून बोलले जात आहे.तसेच काही जागृत नागरिक देखील लवकरच जिल्हाधिकारी जळगाव यांना समक्ष भेटून या संपूर्ण प्रकरणाची पुराव्यानीशी तक्रार देणार असल्याची खात्री लायक माहिती मिळाली आहे.


