Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात "या" ठिकाणी दोन गटांत तुफान राडा : दगडफेकीमध्ये दोन पोलीस जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

Jalgaon Crime : जळगावमधील पाळधी (Paladhi)  गावात दोन गटात तुफान राडा झाला. दगडफेकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दोन पोलीस जखमी झाले आहेत. दगडफेकीनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.
अज्ञात जमावाने पाळधी(Paladhi) पोलीस दूरकेंद्रावरही दगडफेक केली. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. तणावानंतर पाळधी गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.[ads id="ads1"]  
राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांचे गाव पाळधी येथे हा राडा झाला. काल मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला. गावात अद्याप तणावाचं वातावरण आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस जखमी झालेत. जळगावमधून पोलिसांची अतिरिक्त कुमक इथे तैनात आहे. एसआरपीएफच्या (SRPF) तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन करण्यात आले आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर काही संशयितांना अटक करण्यात आलीय. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.[ads id="ads2"]  

नेमका कशावरुन वाद उफाळला

जळगाव शहरातील जुने जळगाव (Old Jalgaoan) येथील काही तरुण पायी दिंडी घेऊन श्री सप्तशृंगी गड वणी येथे निघाले होते. पाळधी गावात दिंडी घेऊन येताच हा वाद उफाळला. वाद्य वाजविण्यावरुन वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दगडफेक झाली. घटनेत झालेल्या दगडफेकीत तीन चारचाकी आणि एका पोलीस वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याने तणावात अधिक भर पडली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!