"त्या" समाजकंटकांना तात्काळ अटक करा सावदा येथील मुस्लिम बांधवांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


------------------------------------------
"सदरील निषेधार्थ घटनेच्या अनुषंगाने सर्वत्र ठिकाणी समस्त समाज बांधवांनी शांतता बाळगून कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवावा.अशा समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहेत.तरी शांतता बाळगून पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करावे.असे आवाहन यावेळी समाजसेवक सोहेल खान व सहकाऱ्यांनी केला"
------------------------------------------
[ads id="ads1"]  
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

गुण्यागोविंदाने राहत असलेल्या हिंदू-मुसलीम बांधवांमध्ये रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने तसेच कायदा व सुव्यवस्थेला मोठी बांधा उत्पन्न करण्यासाठी काही एक कारण नसताना दि.२६ मार्च २०२३ रोजी जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदन तालुक्यातील"अन्वा"या गावात रमजान महिन्यात अतिशय महत्त्व ठेवणारी तरावीहची नमाजपठण करण्यासाठी मस्जिदमध्ये एकटे बसून पवित्र कुराण पठण करीत बसलेले मौलाना जाकीर सैय्यद ख्वाजा यांना थेट मस्जिदीत शिरून काही अज्ञात समाजकंटकांनी बेदम मारहाण करून ब्लैडच्या सहाय्याने त्यांची दाढी सुद्धा कापून टाकल्याची घडलेली धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील मुस्लिम बांधवांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालींएदर पळे यांना २८ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,सदरप्रकारे गंभीर स्वरूपाचे गैरकृत्य करणाऱ्या त्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यात येवून त्यांनी मस्जिद सारखे पवित्र स्थळाची विटंबना सुद्धा विटंबना केल्याने संपुर्ण मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या,तरी या अतिशय गंभीर स्वरुपाचा अशोभनीय अपराध करणाऱ्या समाजकंटकांचा तात्काळ शोध लावून त्यांच्या विरोधात अजामीनपात्र कलमांन्वे दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात यावी.[ads id="ads2"]  
  तसेच तपासचक्र फिरवून पोलीसांनी त्यांना तातडीने अटक करावी.अशी मागणी निवेदनाद्वारे केली.यावेळी समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान,फरीद शेख नुरोद्दीन,युसूफ शाह सुपडू शाह,रजा शाह मासुम शाह,शेख कलिम शेख जलिस,शेख लुकमान शेख रहेमान,फारुख शाह कादर शाह,शेख इरफान शेख इक्बाल,शेख कमरोद्दीन शेख उस्मान इत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!