याबाबत बोलताना आमदार चौधरी म्हणाले, की १९ फेब्रुवारीला अकलूद येथे शुभम सपकाळे या तरुणावर संतोष गुप्ता, शामलाल गुप्ता, अविनाश गुप्ता, राज गुप्ता आणि गोविंद जैन यांनी खुनी हल्ला केला. या हल्ला प्रकरणी आतापर्यंत केवळ संतोष गुप्ता आणि शामलाल गुप्ता यांनाच अटक करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
तापी नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून, अमली पदार्थांचाही व्यापार होत असल्याचा आरोप आमदार चौधरी यांनी केला. या प्रकारांना शुभम सपकाळेने प्रतिकार केला म्हणून त्यावर खुनी हल्ला झाल्याचे सांगून या अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या व्यवहारात भुसावळ येथील मोठे गुंड ही पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. शुभम सपकाळेवर १९ फेब्रुवारीला खुनी हल्ला झाला आणि १९ मार्चला महिनाभराने त्याचे निधन झाले.
हेही वाचा :- बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक ; 1 लाखांचा मुद्देमाल जप्त
मात्र, या दरम्यान पोलिसांनी त्याचा मृत्यूपूर्व जवाबही नोंदवला नाही; यामुळे पोलिसांची आणि आरोपींची काही मिलीभगत आहे काय, असा प्रश्न उपस्थित करून तातडीने संशयताना अटक करण्याची मागणी आमदार चौधरी यांनी विधानसभेत गृहमंत्र्यांकडे केली. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून त्यामुळे तरुण पिढी बिघडत आहे असा आरोप करून तालुक्यात व जिल्ह्यात ऑनलाईन गुन्हेगारी कोणत्या पातळीपर्यंत पोचली आहे याचा अनुभव आपल्याला आल्याचे त्यांनी सांगितले. जहीर काझी नावाची व्यक्ती आपल्या नावाने व आपले फोटो वापरून समाज प्रसार माध्यमांवर व व्हॉट्स अँपवर पैशांची मागणी करीत असल्याचा आरोपही आमदार चौधरी यांनी केला. या प्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करून अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही व चौकशीही झाली नाही, याप्रकरणी तातडीने चौकशी व कारवाई करण्याची मागणी आमदार चौधरी यांनी केली.



