भावाने केला भावाचा खून : जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव  (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
  चोपडा तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर येत आहे लहान भावाने धारदार विळ्याने मोठ्या भावाच्या खून केल्याची घटना शनिवारी दुपारी तालुक्यातील पारगाव शिवारात घडली संदीप प्रताप पाटील वय 36 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.[ads id="ads1"]  

मितावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी दोन मुलांसह राहतात. त्यांच्याकडे दहा एकर शेती आहे त्यांची दोन्ही मुले एकत्रित शेती करतात शनिवारी सकाळी संदीप पाटील वय 36 व सतीश पाटील वय 30 हे शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते तेथे दोघांमध्ये वाद झाला त्यामुळे सतीश याने मोठा भाऊ संदीप याच्यावर धारदार बिळ्याने वार करून त्याच्या खून केला.[ads id="ads2"]  

 दिनांक 25 /3 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता पारगाव शिवारातील शेतात सतीश पाटील व त्याच्या मोठा भाऊ संदीप पाटील यांचे सतीश याची पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून भांडण होऊन सतीश प्रताप पाटील यांनी त्याच्या मोठा भाऊ संदीप प्रताप पाटील वैचारिक याचे विळ्याने पोटाचे डावे बाजूस मारून त्यास दुखापत करून त्याच्या गडा रुमालाने आवरून त्याच्या खून केला असे पोलीस तपासात उघड किस आले आहे.

गावापासून शेत दूर असल्याने घटना लवकर उघडकीस आली नाही संशयित आरोपी शेतातच थांबून होता अडावदचे एपीआय गणेश बुवा, फौजदार चंद्रकांत पाटील, सहाय्यक फौजदार सुनील तायडे, जगदीश राजपूत हे घटनास्थळी पोचल्यानंतर संशयीत आरोपी सतीश यास ताब्यात घेतले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जळगाव येथून ठसे तंज्ज्ञानाचे पाचारण केले होते. व या घटनेच्या पुढील तपास ऋषिकेश रावले साहेब हे करीत आहेत

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!