नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल सात वर्षानंतर होणार असल्याने त्याकडे संपूर्ण नांदगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत आजी-माझी आमदारांची प्रतिष्ठापनाला लागणार आहे. या दृष्टीने व्युहरचना आखली जात आहे. [ads id="ads1"]
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही नांदगाव तालुक्याच्या राजकारणात प्रवेश करण्याची संधी समजली जाते. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी या निवडणुकीची तयारी करत आहेत. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.[ads id="ads2"]
कोरोना काळानंतर नांदगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ही पहिलीच निवडणूक होत आहे. संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून राजकीय हालचाली गतिमान झाला आहेत. तर पॅनल मध्ये आपली वर्णी लागावी म्हणून इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार सुहास कांदे यांची गटाची वर्चस्व होते. मागील संचालक मंडळाने नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील पूर्व भागात असलेल्या बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समितीची निर्मिती केली आहे. 27 फेब्रुवारी 2022 पासून प्रशासकीय राजवटीला सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सुहास कांदे व महाविकास आघाडीतील माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, संजय पवार, एडवोकेट अनिलदादा आहेर, पंकज भुजबळ यांच्यात सामना रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
........................................
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाच कोटींची उत्पन्न
मागील पंचवार्षिकमध्ये नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न एक कोटी 75 लाख रुपये उत्पन्न होते. नांदगाव, बोलठाण, न्यायडोंगरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न चार कोटी 95 लाख रुपये आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बोलठाण येथे दोन एकर जागेत व एक एकर मध्ये नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती निर्मिती करण्यात येऊन इमारत, तारेचे कंपाउंडसह शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच न्यायडोंगरी येथे बाजार समिती आहे. तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमधुन उत्पन्न मिळते
......,..................................
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना प्रवेश शुल्क होते. ते आमच्या काळात बंद करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी वॉटर एटीएम सुविधा दिली. नाशिक जिल्ह्यात प्रथमच नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संगणकीकरण करण्यात आली आहे. यामुळे शेतमालाचे बाजार भाव किती आहेत. तसेच शेतकऱ्यांनी आपला माल कोणत्या व्यापाराकडे घेतला आहे. त्याची रक्कम किती देणे आहे. याबाबतचा एसएमएस शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होते....................,.........
तेज कवडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव
........................................
मतदार
एकूण मतदार :- १६६४
सोसायटी गट :- ६२३
ग्रामपंचायत गट :- ५७३
व्यापारी गट :- ३५६
हमाल मापारी गट :- ११२
आदी मतदारांची सविस्तर आकडेवारी आहेत.
.......................................



