रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना चे संस्थापक अध्यक्ष, माननीय" माजी राज्यमंत्री बच्चु भाऊ यांच्या विचाराने प्रेरित होऊन, उत्तर महाराष्ट्र प्रहार जनशक्ती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, अनिल भाऊ चौधरी ,यांच्या आदेशाने तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष, माननीय "बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आज दिनांक 26/03/ 2023 या रोजी दुपारी ठीक तीन ते पाच वाजेच्या दरम्यान ,रावेर तालुक्यातील खानापूर व अहिरवाडी या दोन गावांमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, या दोन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads1"]
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष ,माननीय बाळासाहेब पाटील ,यांच्या उपस्थितीत प्रहार दिव्यांग क्रांती या दोन शाखांचे उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
त्या ठिकाणी रावेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या 5% टक्के निधी तसेच 50% घरपट्टी माफ असे दोन फायदे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायती मधून देण्यात येतात. तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्था अध्यक्ष, माजी राज्यमंत्री माननीय बच्चु भाऊ, यांच्या अथक प्रयत्नामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी "स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय उभारण्यात आले .तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या 44 योजना त्यांच्या दारा पर्यंत पोहोचल्या जातील. असे विधान बच्चु भाऊ यांनी संपूर्ण दिव्यांग बांधव यांना केले.[ads id="ads2"]
जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ता, कार्यकारणी .यांना दिव्यांग बांधव यांना लागेल ते मदत करण्यासाठी जबाबदारी माननीय प्रहार दिव्यांग क्रांती चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सोपविण्यात आली.
त्याबद्दल त्यांचे स्वागत प्रहार जनशक्तीचे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष माननीय सुरेश दादा पाटील, उपजिल्हाध्यक्ष दिनेश सैमिरे,रावेर तालुका प्रहार दिव्यांग अध्यक्ष विनोद कोळी, यांनी फुलगुच्छ देऊन करण्यात आले. त्या ठिकाणी उपस्थित प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश दादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिनेशसैमिरे,प्रहार दिव्यांग रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी ,प्रहार दिव्यांग उपाध्यक्ष शशिकांत पाटील, दिव्यांग उपाध्यक्ष जितेंद्र कोळी ,प्रहार दिव्यांग संपर्कप्रमुख मोहसीन शेख, प्रहार दिव्यांग तालुका संघटक आनंदा कोळी, प्रहार जनशक्ती तालुका संपर्कप्रमुख फिरोज तडवी, प्रहार अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वसीम शेख ,छोटू जागीरदार, खानापूर दिव्यांग शाखा अध्यक्ष युवराज धांडे, अहिरवाडी दिव्यांग शाखाध्यक्ष सुनील सुतार तसेच हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती शाखा उद्घाटन सोहळ्या या ठिकाणी होती.



