रावेर पोलिस स्टेशन ला एका जणांविरुद्ध गुन्हा
पीडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी तरुणाने साधारण सात महिन्यांपूर्वी पीडीता तिच्या घरी एकटी असतांना तीच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच यानंतर धमकी देत संधी साधून दोन ते तीन वेळा जबरदस्तीने शारीरीक संबंध करुन कोणास काही सांगितले तर जिवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली. [ads id="ads2"]
यामुळे पिडीतेने भीतीपोटी कोणास काहीएक सांगीतले नव्हते. त्यानंतर पीडिता ही मागील वर्षी दसरा सन झाल्यावर तीच्या भाऊ सोबत ऊस तोडणीसाठी बारामती (Baramati) येथे गेली होती.
हेही वाचा :- बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक ; 1 लाखांचा मुद्देमाल जप्त
हेही वाचा :- भावाने केला भावाचा खून : जळगाव जिल्ह्यातील घटना
हेही वाचा :-अकलूद येथील शुभम सपकाळेच्या फरारी संशयितांना त्वरित अटक करा : आ. शिरीष चौधरींची विधानसभेत मागणी
यानंतर १५ दिवसापूर्वी गावी येथे परत आल्यावर पिडीतेचा पोटाचा आकार वाढत असल्याने तिला तीचे नातेवाईक सामान्य रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून पीडिता ७ महिन्याची गर्भवती असल्याचे सांगीतले. या प्रकरणी संशयित आरोपी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रावेर पोलिस स्टेशन च्या (Raver Police Station) पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील ह्या करीत आहेत.


