निंभोरा पोलिसात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


एका ७० वर्षीय महिलेने निंभोरा पोलीस स्टेशन ता. रावेर येथे दि. २५/०५/२०२2 फिर्याद दिली होती की, तीच्या ४० वर्षीय मुलाला अज्ञात कारणावरून आरोपीने खून केला व त्याचा मृतदेह सिंगत ता रावेर जि जळगाव शिवारात टाकून दिला आहे अश्या फिर्यादी वरून निंभोरा पोलीस स्टेशन येथे ३०२,२०१ भा.द.वि. कलम नुसार गुन्हा दाखल झाला होता.[ads id="ads1"]  

पोलिसांनी तपासात संशयित आरोपी नामे संतोष निनू बेंडाळे याला दि २६/०५/२०२२ रोजी अटक केली होती. त्याला दि २७/०५/२०२२ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रावेर यांच्या समोर हजर केले होते. मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीला ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती व त्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.[ads id="ads2"]  

पोलिसांनी या प्रकरणात अनेकांचे जाबजबाब नोंदवून तपास पूर्ण करून दोन आरोपी विरुद्ध दोष- रोप पत्र मा सत्र न्यायाधीश साहेब भुसावळ यांचे न्यायालयात दाखल होते. या प्रकरणातील पहिला अटक केलेला आरोपी नामे संतोष निनू बेंडाळे यांनी अॅड. विशाल धुंदले यांच्या मार्फत भुसावळ सत्र न्यायालयात दि १७ जानेवारी २०२३ नियमिय जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यात अॅड. विशाल धुंदले यांनी अनेक बाबींवर प्रखर युक्तीवाद केला होता.

हेही वाचा:- मुक बधीर महिलेचे वारसाचा शोध होण्यास जळगाव पोलसांकडून जनतेला आवाहन

हेही वाचा:-रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी नग्नावस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश २ भुसावळ यांनी दि ६ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोपीला ५० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. विशाल धुंदले यांनी काम पाहिले. तर त्यांना अॅड. गगन वाकोडे,  दुर्गेश लहासे यांनी सहकार्य केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!