नांदगाव तालुक्यातील मनमाड नगर परिषद शाळा इमारत पृथ्वीकरणाच्या कामाचे सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नांदगाव - (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळा इमारतींच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]  

        मनमाड शहरातील विविध नगर परिषद शाळांना भेट दिल्यानंतर शाळांचे इमारतींचे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे निदर्शनास आले. तसेच इमारत परिसरात सुशोभीकरण करणे व उत्तम वातावरण असणे गरजेचे असल्याचे संकल्पना नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे मांडली असता. या विषयाची तात्काळ दखल घेत निधीसाठी पाठपुरावा केला असून नगर विकास विभाग अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेत मनमाड सह नांदगावच्या नगरपरिषद शाळांना एकूण दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. [ads id="ads2"]  

  आणि प्रत्यक्षात सदर नगरपरिषद शाळांच्या इमारत नुतनीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल आणि स्वच्छ सुंदर असलेल्या इमारतीत शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल असे या भूमिपूजन प्रसंगी सौ. अंजुमताई सुहास कांदे यांनी बोलताना सांगितले.

          मनमाड येथे विविध शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी सौ.अंजुमताई कांदे यांचे घोषणा देत स्वागत केले. आमदारांच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या शाळांच्या इमारत नूतनीकरणाबद्दल शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सौ. अंजुम कादे यांचे आभार मानले.

            याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, बांधकाम विभागाचे खैरनार साहेब, शिक्षण अधिकारी चंद्र मोरे मॅडम, महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल, नाझमा मिर्झा , मोहिनी , राजाभाऊ अहिरे, मंदाताई भोसले, शाहिन शेख, सरला गोगड, अलका कुमावत, नांदगाव शहर प्रमुख रोहिणीताई मोरे, डॉक्टर वर्षा झाल्टे, गरीबभाई शेख, अमीन पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, अज्जूभाई शेख, लाला नागरे, दिनेश घुगे, गोविंद रसाळ, दिवार बाबूजी, रुपेश अहिरे, रविभाऊ खैरनार, ललित रसाळ, गोकुळ परदेशी, अमजद पठाण, मिलिंद उबाळे, लोकेश साबळे, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे, अजिंक्य साळी, राहुल साबळे, दीपक जोरणे, विलास परदेशी, मोहसीन पठाण, मजहर खान, अरबाज शेख, निसार पठाण, चैतन्य परदेशी, जमीर शेख, आसिफभाई शेख, जय अहिरे, जॉनी जॉर्ज, प्रमोद अहिरे, विलास परदेशी, अज्जू पठाण, नितीन राजपूत, बाजीराव चव्हाण, अर्जुन सोनवणे, संदीप निकम, गुलाब जाधव, आनंदा गवळी, नितीन बामणे, निलेश व्यवहारे, कुणाल विसापूरकर, आदीसह मोठ्या संख्येने शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!