ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
याबाबत सविस्तर वृत्त असे की निंभोरा येथे ग्रामपंचायत मध्ये ९ सफाई कर्मचारी असून त्यातील सहा कर्मचारी कायमस्वरूपी व तीन कर्मचारी रोजंदारीवर काम करतात या कर्मचाऱ्यांचा सात ते आठ महिन्यांपासून ग्रामपंचायतीकडे पगार थकीत असून त्यांनी त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे पगारासाठी वेळोवेळी विनंती अर्ज केलेले आहे.[ads id="ads1"]
प्रत्येक महिन्याच्या मासिक मीटिंगमध्ये थकीत पगार व राहणीमान भत्त्याचे फरकासह रक्कम अदा करण्याबाबत ग्रामपंचायत सफाई कर्मचारी मागणी करीत आहे परंतु आज पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता सुद्धा देण्यात आलेला नाही. ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता देणे बंधनकारक असताना सुद्धा सदर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर मागील 14 वर्षापासून अन्याय करीत आहे मागील 10 वर्षापासून कुठल्याही कर्मचाऱ्याचा राहणीमान भत्ता देण्यात आलेला नाही मागच्या महिन्यात मासिक मीटिंगमध्ये ग्रामपंचायत सरपंच यांनी होळी अगोदर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व राहणीमान भत्ता अदा करण्याचे आश्वासन दिले होते.[ads id="ads2"]
परंतु या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्यामुळे त्यांची होळी अंधारात गेली प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी या सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे जर लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व राहणीमान भत्ता मिळाला नाही तर सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील असे ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांनी सांगितले आहे पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीत सरपंच जबाबदार राहतील असे देवेंद्र आदीवाल यांनी म्हटले आहे


