रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
आज दिनांक 25 रोजी महाराष्ट्र जनक्रांति मोर्चा तर्फे निंभोरा पोलिस स्टेशनचे सउपोनि.निरीक्षक,श्री.कोळंबे यांना निवेदन देण्यात आले की जळगाव येथील पूर्वाश्रमिचा बौद्ध वस्तीत (रेडक्रॉस सोसायटी समोर ),1983 पासून स्थापन असलेले तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवण्याचे षड़यंत्र करणारे आरोपी यांना तात्काळ अटक करावी व त्यांचे विरद्ध कलम 120(ब )लावण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]
तसेच दिनांक 16 मार्च ते आज पर्यंत 10 दिवस उलटून गेले व विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित दोन वेळा चर्चा होऊन व मा.उपसभापतीनी आदेश देऊन सुद्धा ही पोलिस प्रशासन व यंत्रणा आरोपीला पकडू शकले नाही, यामुळे सर्व सामान्य लोकांना काय न्याय मिळेल तरी संबधित आरोपी यांना तात्काळ अटक करावी.[ads id="ads2"]
अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.निवेदनावर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वानखेड़े, सामाजिक कार्यकर्ते विनायक जहूरे खिर्डी,तालुका अध्यक्ष श्रीराम कोळी, नरेंद्र वानखेड़े, प्रमोद कोळी, राजू वानखेड़े, सुपडु वाघ, गोपाल वानखेड़े, योगेश वानखेड़े आदी उपस्थित होते.
हेही वाचा:- जळगाव जिल्ह्यात "हा" कायदा लागू....जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची घोषणा