रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी
डॉ.श्री प्रल्हाद बाबुराव पाटील व सौ.शोभाबाई प्रल्हाद पाटील, निंबोल. यांची कन्या चि.सौ.का.नम्रता हिचा विवाह सोहळा दिनांक 13/3/2023 रोजी पार पडला. त्या निमित्त वधू वरास आशीर्वाद मिळावा, या उद्देशाने त्यांनी आपली मुलगी नम्रता हिच्या हातून सेवा समर्पण बहुउद्देशीय संस्था निंबोल या संस्थेस वीस हजार रुपयाची रोख रक्कम मदत म्हणून दिली.[ads id="ads1"]
आणि समाजाकडे एक वेगळा आदर्श ठेवला. मिळालेली रक्कम शिवम गोपाल पाटील, निंबोल व रमेश शांताराम कोळी, निंबोल येथील मृत्यूशी झुंझ देत असलेल्या रुग्णांना प्रत्येकी 10-10 हजार रुपये प्रमाणे सेवा समर्पण संस्थेने आपल्या परीने मदत तात्काळ पोहचवली. बहुउद्देशीय सेवा समर्पण संस्था निंबोल तालुका रावेर यांच्या चांगल्या कार्यामुळे सर्व समाज बांधव स्तरावरून त्यांचे कौतुक करण्यात येत आहेत. [ads id="ads2"]
आपले नाव,फोटो कुठंही न देण्याची डॉक्टर दांपत्यांनी संस्थेस विनंती केली होती.परंतु या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी या अनुषंगाने तसेच इतर गरीब कुटुंबातील रुग्णांना आपल्या बहुउद्देशीय सेवा समर्पण संस्थेमार्फत मदत मिळावी म्हणून या संस्थेच्या कार्य चांगल्या प्रकारे प्रगती पथकावर आहेत. समस्त समाज बांधव आणि सर्व गावकऱ्यांकडून संस्थेचे आभार व्यक्त केले जात आहे.